जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 27, 2022

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

 जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पडिक असलेल्या इमारतीमध्ये एका 72 वर्षीय महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.रजिया सलीम शेख असे मृत महिलेचे नाव असून ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटरचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मयत महिला ही जुना विडी घरकुल परिसरात राहत होती. मागील दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती. त्यामुळे नातेवाईक देखील शोध घेत होते. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस शासकीय कार्यालय बंद असल्याने नागरिकांची वर्दळ देखील या भागात नव्हती. आज सकाळी लोकांना परिसरात दुर्गंधी पसरल्याचे जाणवलं. यावेळी पाहणी केली असता मृतदेह आढळल्याने सर्वांना धक्काच बसला.

या महिलेच्या मुलींनी ओळख पटताच टाहो फोडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यूचे नेमकं कारण काय हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस करत आहेत. तूर्तास पोलिसांनी या संदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

अमरावतीच्या परतवाडा तालुक्यातील सापन धरणात दोन युवतींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सापन धरणावर काल (26 जून) दुपारी एका युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर काही वेळातच दुसरा एका मुलीचा मृतदेह आढळून आला. या दोन्ही मुली परतवाडाच्या कांडली येथील असून गायत्री पडोळे आणि हेमलता पाटे अशी त्यांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी यांच्या कुटुंबांनी या दोघी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. गायत्री ही होमगार्ड असून या दोघीही मुली पोलीस भरतीची तयारी करत होत्या अशी माहिती मिळत आहे. धरणाच्या परिसरात या दोन्ही युवतीचे मृतदेह आढळल्याने हा घात की अपघात याचा तपास परतवाडा पोलीस करत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages