Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

 सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज  जयंती उत्साहात साजरी


सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात लोकराजा शाहू महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी प्रतिमापूजन केले.
      उपस्थित विद्यार्थ्यांना स्नेहलता बाबर यांनी न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी  शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी केलेले महान कार्य, समताधिष्ठित समाज व्यवस्थेबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविली. त्यांनी कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी दूरदृष्टीने प्रकल्प, योजना राबविणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज होते, अशी माहिती सांगून त्यांच्या कार्याचा परिचय करुन दिला.
   सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जगन्नाथ साठे यांनी केले तर आभार रेश्मा बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख शुभांगी पवार यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक,विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments