जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामेश्वर नगर येथे विध्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

परंडा(कटूसत्य वृत्त):- परंडा तालुक्यातील शिराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामेश्वर नगर येथे आज शाळेच्या पहिल्या दिवशी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांना अर्धा डझन वह्या,पेन पेन्सिल तसेच शाळेकडून पुस्तके या शालेपयोगी वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिकांचे शाळेकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक नागनाथ रगडे,सहशिक्षक शिंदे सर, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी चौरंगनाथ वाघमोडे,शालेय कमिटीचे अध्यक्ष हरी सलगर,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण हसवले,शालेय कमिटीचे सदस्य विजय गडदे,हनुमंत दुधाळ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment