सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 15, 2022

सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरू

 सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरू

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण आणि गुलाब पुष्पाची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. दोन वर्षानंतर आज पहिल्यांदा कोरोनामुक्त वातावरणात शाळा सुरू झाली आहे.

सोलापुरातील संभाजीराव शिंदे प्रशालेत मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती यावेळी दिसली. जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 10 हजार शिक्षक आज विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत हजर होते. विद्यार्थ्यांची ओवाळणी करत गुलाब पुष्पाची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. एकूण 3 लाख विद्यार्थी शाळेत हजर राहतील हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages