संजय गांधी, श्रावणबाळ अनुदान त्वरित जमा करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 28, 2022

संजय गांधी, श्रावणबाळ अनुदान त्वरित जमा करा

 संजय गांधी, श्रावणबाळ अनुदान त्वरित जमा करा

राष्ट्रवादीची महिला शहराध्यक्ष यशोदा कांबळे यांनी दिले निवेदन

मोहोळ  (कटूसत्य वृत्त):-संजय गांधी श्रावणबाळ दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यासाठीचे निवेदन माजी आमदार राजनजी पाटील, आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी मोहोळ शहर महिला अध्यक्षा यशोदा कांबळे यांनी मोहोळचे नायब तहसीलदार श्रीमती लीना खरात यांना देऊन शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली.

   यावेळी यशोदा कांबळे यावेळी म्हणाल्या की शहर व तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ योजनेअंतर्गत वयोवृद्ध घटस्फोटित परित्यक्ता विधवा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग लाभार्थ्याचे सुमारे तीन महिन्यापासून चे अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांकडून अनुदान मागण्या संदर्भात शासकीय कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत परंतु कार्यालयाकडील कर्मचारी अधिकारी आणि येणाऱ्या  वयोवृद्ध ,अपंग ,विधवा , घटस्फोटीत, परितक्त्या , महिलांना शासनस्तरावरून अनुदान प्राप्त झालेले नाही. तुटपुंज्या शासनाच्या अनुदानावर हे लाभार्थी आपले उदरनिर्वाह भागवत असून यांना आर्थिक स्त्रोत अन्न असल्याने या अनुदानात कडे सामान्य लाभार्थ्यांचा कल असल्याने हे अनुदान शासनाने तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे. याबाबतची दखल घेत राष्ट्रवादी  आघाडीच्या महिला अध्यक्ष यशोदा कांबळे यांनी नायब तहसीलदार श्रीमती लीना खरात
निवेदन देऊन प्रलंबित असणारे तीन महिन्याचे  लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages