1 लाख 10 हजार रुपये लाच घेणारा लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल ACB च्या जाळ्यात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 5, 2022

1 लाख 10 हजार रुपये लाच घेणारा लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल ACB च्या जाळ्यात

1 लाख 10 हजार रुपये लाच घेणारा लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल ACB च्या जाळ्यात

                लोणीकंद (कटूसत्य वृत्त):- अनधिकृत बांधकाम  थांबवण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये लाच मागून 10 हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल शिरीष आप्पासाहेब कामठे  याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

                पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे (वय - 36) यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  ही कारवाई शनिवारी केली. 

                याबाबत 52 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये दुसऱ्या व्यक्तीने अतिक्रमण  केले. तक्रारदार यांच्या जागेत सुरु असलेले अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे याने एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता कामठे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कामठे याने एक लाख दहा हजार रुपये मागणी करुन त्यातील 10 हजार रुपये स्विकारताना पुणे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

                ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस शिपाई महाशब्दे, महिला पोलीस शिपाई साका, चालक पोलीस हवालदार देसाई यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages