विठ्ठलवाडी येथील ओंकार कदम यांचे अभियांञिकी गेट परिक्षेत घवघवित यश
.jpg)
माढा (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलवाडी ता-माढा येथील ओंकार राजाभाऊ कदम यांची आभियांञिकी क्षेञातील अतिशय आव्हानात्मक व कठीण अशी गेट पात्रता परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील अतिशय महत्त्वाची अशी समजली जाणारी संगणक विज्ञान ही विद्याशाखा, प्रचंड स्पर्धा, यावर प्रामुख्याने शहरी विद्यार्थ्यांचे असलेले वर्चस्व, देशातील एक अग्रगण्य अशी मुंबई आयआयटी आणि त्यांनी घेतलेली स्वतंत्र व कठीण अशी लेखी परीक्षा, नऊ तज्ञांच्या पॅनेलने तब्बल ४५ मिनिटांचा घेतलेला इंटरव्ह्यू या सर्व अग्निदिव्यातून मिळालेले हे यश आहे .असे ओंकार कदम यांनी सांगितले.वडिल राजाभाऊ कदम हे जि.प.शाळा गुंडवस्ती येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठलवाडी हे गाव सतत स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून पुढे येत आहे.ओंकार हा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.यावेळी परिसरात सर्वञ कौतुक होत आहे.या यशाबद्दल समाजकल्याण आधिकारी संतोष जाधव मोहन आण्णा कदम स्वामी समर्थ पंतसंस्थेचे अनिल अनभुले उपसरपंच हनुमंत आण्णा जाधव अभियंता ज्ञानेश्वर सस्ते सुनिल शेंडगे धनाजी सस्ते श्रीकांत काशिद ,सुहास चवरे रणजित जाधव किशोर गुंड दिनेश गुंड समाधान कोकाटे सोमनाथ खरात गोरख शेगर यांनी अभिनंदन केले.
0 Comments