Hot Posts

6/recent/ticker-posts

डोळ्यात चटणी टाकून हॉटेल व्यवसायिकास लुटले

डोळ्यात चटणी टाकून हॉटेल व्यवसायिकास लुटले

             मोहोळ (कटूसत्य वृत्त):- हॉटेल बंद करून रात्री घराकडे परतत असलेल्या हॉटेल व्यवसायिक विश्वराज भोसले यांना डोळ्यात मिरची पावडर टाकून चोरट्यांनी ३९ हजाराची रोकड लंपास केली आहे . ५ जुन रोजी रात्री १ च्या सुमारास ही घटना मोहोळ शहराजवळील नरखेड रोड च्या ब्रीज जवळ घडली आहे. या घटनेने मोहोळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

             याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मोहोळ शहरातील हॉटेल व्यवसायिक शिवराज हॉटेल चे मालक शिवराज भोसले हे दिवसभरातील व्यवसायातुन रक्कम बॅगमध्ये घेऊन जात असताना रात्री बाराच्या सुमारास हॉटेल बंद करून घराकडे निघाले असता नरखेड रोडच्या ब्रीज खालून जात असताना अंधाराचा फायदा घेत मोटरसायकलीवर तीन येऊन मोटर सायकलला  त्यांची मोटर सायकल आडवी लावून डोळ्याच्या मिरची टाकुन मारहाण करून ३९ हजार चोरून नेले याबाबतची फिर्याद शिवराज हॉटेल चे मालक विश्वराज भोसले यांनी मोहोळ पोलीसात दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments