Hot Posts

6/recent/ticker-posts

वाढदिवसाच्या कारणावरून सोलापूरात दगडफेक ; पोलिस वेळेत आल्याने अनर्थ टळला

वाढदिवसाच्या कारणावरून सोलापूरात दगडफेक ; पोलिस वेळेत आल्याने अनर्थ टळला

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दोन गटात वाढदिवसाच्या कारणावरून मुकुंदनगर येथे दगडफेक झाली. हा प्रकार आज शुक्रवारी (दि.३ जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या दगडफेकीत १०० लोकांचा जमाव जमला होता.त्या जमावामध्ये दगडफेकीत काही लोक जखमी झाले आहेत. पोलीस वेळेत आल्याने पुढील अनर्थ टळला.

               मुकुंद नगर परिसरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून भालशंकर व गायकवाड या दोन गटात हाणामारी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूकडील लोकांनी रस्त्यांवरील दगड व विटा एकमेकांवर फेकल्या. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुकुंद नगर येथील सार्वजनिक रोडवर वाढदिवस साजरा करताना रहदारीला अडथळा झाला होता.

               त्यावेळी भालशंकर व गायकवाड गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला शाब्दिक चकमक झाली. दोन्ही गटाचा मोठा जमाव जमला. त्यावेळी दोन्ही गटांनी विटा व दगडफेक करण्यास सुरु केली. दरम्यान या संदर्भात जोडभावी पेठ पोलिसांना घटनेची माहिती समजताच तात्काळ त्याठिकाणी पोलिस दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून वाद मिटला.

               जखमी झालेल्यांना लोकांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दरम्यान, वाढदिवस रस्त्यावर साजरा करणे हा गुन्हाच असून कायदा हातात घेणे हादेखील मोठा गुन्हा आहे. त्यामुळे दोन्ही गटातील व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल,अशी माहिती जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Reactions

Post a Comment

0 Comments