Hot Posts

6/recent/ticker-posts

दौंड – इंदूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात वाढ

दौंड – इंदूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात वाढ

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी दौंड – इंदूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

               या निर्णयामुळे सर्वसामान्यांना आता रेल्वेत आणखीन जागा मिळणार आहे. अनारक्षित प्रवाशांची वाढती गर्दी व मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने दौंड-इंदूर एक्स्प्रेस डब्यात जनरल डबा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता या एक्स्प्रेसला २२ कोच असणार आहेत. यात ब्रेकयान १, एसी २ टियर २, एसी ३ टियर ६, स्लीपर ८, जनरल ४, गार्ड ब्रेकयान १ असे २२ डबे असणार आहेत.

               कोच क्रमांक डी १ ते डी ३ हे २८ जून २०२२ पर्यंत आरक्षित असणार असून, २९ जून २०२२ पासून सर्व जनरल कोच अनारक्षित राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अतिरिक्त लागलेला कोच २ जून ते २९ जून २०२२ पर्यंत अनारक्षित राहणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments