Ads

Ads Area

ध्येयनिश्चिती' आयुष्यात यशाची पहिली पायरी - प्राचार्य भीमाशंकर पैलवान

 ध्येयनिश्चिती' आयुष्यात यशाची पहिली पायरी - प्राचार्य भीमाशंकर पैलवान


सांगोला विद्यामंदिर लातूर पॅटर्न नीट, जेईई,सीईटी फाउंडेशन कोर्स सुरवात

          सांगोला  (कटूसत्य वृत्त):- सांगोला व सांगोला परिसरामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थ्यांना गुणात्मक व रचनात्मक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने कै.गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांनी १९५२ मध्ये विद्यामंदिरची स्थापना केली. स्थापनेपासून विद्यामंदिर गुणवत्तेत अग्रेसर आहे. सद्यस्थितीला बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या  स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना यश मिळावे हा हेतू ठेवून सांगोला विद्यामंदिर लातूर पॅटर्न इयत्ता अकरावी व बारावी मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांनी बारावीनंतर होणाऱ्या स्पर्धा परीक्षा त्यासंदर्भात आत्ताच ध्येयनिश्चिती करावी व आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या सांगोला विद्यामंदिर लातूर पॅटर्न मार्गदर्शन वर्गामध्ये प्रवेश घ्यावा, विषयाचा ग्रुप ठरवावा. अभ्यासामध्ये सातत्य, नियोजन,जिद्द ठेवावी तरच धवल  यश मिळेल, असे प्रतिपादन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी केले. सांगोला विद्यामंदिर लातूर पॅटर्न सन २०२२-२३ बॅच साठी १० एप्रिल पासून ४० दिवसांचा फाऊंडेशन कोर्स सुरू होणार आहे.त्यासंदर्भात आयोजित  विद्यार्थी-पालक शिक्षक सभेमध्ये ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सां.ता.शि.प्र.मंडळ संस्था सचिव म.शं.घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, सांगोला विद्यामंदिर लातूर पॅटर्नचे प्रमुख श्री.सिद्धेश्वर चव्हाण, शिवलिंग स्वामी, संस्था समन्वयक प्रा.प्रकाश धोत्रे उपस्थित होते.

          पुढे बोलताना प्राचार्य पैलवान म्हणाले विद्यार्थ्यांनी वेळोवेळी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे, एकाग्रता ठेवून अभ्यास करावा,ध्येय समोर ठेवावे व  ते मिळवण्यासाठी मनाची गुंतवणूक,बांधीलकी व मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. 

          या सभेमध्ये श्री.शिवाजी चौगुले, संस्था समन्वयक प्रा.प्रकाश  धोत्रे , लातूर पॅटर्नचे प्रमुख श्री.सिद्धेश्वर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या सभेसाठी इयत्ता १० वी परीक्षा दिलेले  विद्यार्थी, पालक, ज्युनिअर कॉलेजमधील अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          प्रास्ताविक उपप्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.राणी दिक्षित यांनी केले तर  आभार प्रदर्शन प्रा.सुप्रिया गायकवाड यांनी केले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close