Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांचेवर लाच मागणी प्रकरणी कारवाई

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांचेवर लाच मागणी प्रकरणी कारवाई

          पुणे (प्रविण शेंडगे) : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांचेवर लाच मागणी प्रकरणी कारवाई.गुन्हा नोंद क्रमांक स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. ६९/२०२२
तक्रारदार आरोपीचे नाव व कार्यालय -
पुरुष, वय २६ वर्षे लोकसेवक
१) प्रमोद कृष्णराव तुपे, कार्यकारी अभियंता, कृषी उत्पन्न बाजार समिती, गुलटेकडी, पुणे
२) अरविंद दामोदर फडतरे, उप अभियंता, कृषी उत्पन्न बाजार समिती, गुलटेकडी, पुणे

मागणी केलेली लाचेची रक्कम
२,००,०००/- रू. (दोन लाख रूपये)

पडताळणी दिनांक :- १०/०८/२०२१, ११/०८/२०२१, २१/०८/२०२१, २३/०८/२०२१ गुन्हा दाखल दिनांक :- ०६/०४/२०२२

थोडक्यात माहिती :- यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील इमारतीच्या स्वच्छतागृहाचे नुतनीकरण व उद्योग भवन क्र. ०१ येथील स्लॅबचे वॉटर प्रुफिंगचे काम केले होते या दोन कामांचे बिलांचे मंजुरीकरीता बिलाच्या १५ टक्के रकमेची लाच मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

          सदर तक्रारीची पडताळणी केली असता कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील इमारतीच्या |स्वच्छतागृहाचे नुतनीकरण व उद्योग भवन क्र. ०१ येथील स्लॅबचे वॉटर प्रूफिंगचे करणे या दोन कांमांचे बिलांचे मंजुरीकरीता यातील आरोपी लोकसेवक क्र.०१ व ०२ यांनी तक्रारदार यांचेकडे २ लाख रूपये लाचेची मागणी केली म्हणून वरीलप्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

          गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही ला.प्र.वि. पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार यांनी केली असून पोलीस उप अधीक्षक सीमा आडनाईक तपास करत आहेत.

          सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री राजेश बनसोडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे व श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

          शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबावत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments