शेवरे येथिल वाळूउपसा प्रकरणी चौकशी करून मंडलाधिकारी व तलाठी यांना सेवेतून बडतर्फ करा अन्यथा अमरण उपोषण करणार : विठ्ठल मस्के - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 18, 2022

शेवरे येथिल वाळूउपसा प्रकरणी चौकशी करून मंडलाधिकारी व तलाठी यांना सेवेतून बडतर्फ करा अन्यथा अमरण उपोषण करणार : विठ्ठल मस्के

शेवरे येथिल वाळूउपसा प्रकरणी  चौकशी करून मंडलाधिकारी व तलाठी यांना सेवेतून बडतर्फ करा अन्यथा अमरण उपोषण करणार : विठ्ठल मस्के

            टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मौजे शेवरे ता. माढा नदीपात्रातील अनेक वर्षापासून नदीपात्रात वाळू माफियाशी संगणमत करून महसूल विभागाचे अधिकारी आणि तलाठी यांनी अवैद्यरित्या वाळू उपसा होत असल्याची तक्रार रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक विठ्ठल मस्के यांनी तहसीलदार प्रांत अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे १०/८/२०२१ रोजी दिली होती. सदर प्रकरणाची प्रशासनाने योग्य दखल घेतली नसल्याने विठ्ठल मस्के यांनी 19/04/2022 रोजी अमरण उपोषण करत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

            सविस्तर वृत्त असे की शेवरे तालुका माढा या गावच्या भीमा नदीच्या पात्रात दिनांक 22/08/2021 रोजी विठ्ठल मस्के यांना अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर समक्ष पाहणी केली असता वाळूने भरलेला सव्वा ब्रास ट्रेलर आढळून आला. वाळूने भरलेल्या ट्रॉली चा पंचनामा करण्यासाठी कोतवाल तलाठी पोलीस पाटील आणि टेंभुर्णी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यामुळे पोलीस घटनास्थळी आले होते. मा. कोरबू मॅडम सर्कल यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला तक्रार न दिल्यामुळे पोलीस घटनास्थळावरून निघून गेले.

            तरी सदरचा टेलर सव्वा ब्रास वाळूने भरलेला याचा पंचनामा केला परंतु तो टेलर वाळूने भरलेला जप्त केलेला नाही यावरून असे सिद्ध होते कि सर्कल आणि तलाठी यांनी वाळू माफियांशी संगणमत करून ट्रेलर सोडून दिला. असे विठ्ठल मस्के यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. भीमा नदीच्या पात्रामध्ये वाळू माफियांचा ट्रेलर धरल्यामुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

            तलाठी व सर्कल यांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे यांच्या पासूनही माझ्या जीवितास धोका आहे. वाळू माफियांशी संगणमत केलेले महसूल विभागाचे सर्कल व तलाठी भ्रष्ट अधिकारी यांच्याकडून नदीपात्रातील वाळू उपसा केलेल्या खड्ड्याचे मोजमाप करून होणारी कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी वसूल करून अशा भ्रष्ट मंडल अधिकारी व तलाठी यांना सेवेतून बडतर्फ व खातेनिहाय चौकशी करून बेहिशोबी संपत्ती ची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे विठ्ठल मस्के म्हणाले.

            सदर प्रकरणातील पुरावे देऊन सुद्धा महसूल कडून कारवाई का होत नाही जर येत्या 19 तारखेपर्यंत कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषण करणार असा इशारा विठ्ठल मस्के यांनी यावेळी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages