मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुस्लिम पाच्छा पेठ येथील रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. हा कार्यक्रम ज्येष्ठ ओबीसी नेते इरफान सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली व सोशल बॅँकेचे संचालक शफी कॅप्टन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रारंभी महिबूब कुमठे यांनी कुरआनातील श्लोकाचे पठण केले. संस्थेचे अध्यक्ष हाजी तजम्मुल चॉँदा यांनी स्वागत करत संस्थेचा अहवाल सादर केला. या वेळी हाजी अ. जब्बार नल्लामुदी, अ. हमीद डाळिंब वाले, के. सी. पटेल, शरीफ शाहजी, हाजी दाऊद मंगलगिरी, अ. गनी हाेटगी, ताजोद्दीन गढवाल, माैलाली लाेकापल्ली, शमीम चाॅँदा अादी उपस्थित हाेते. रफिक खान यांनी सूत्रसंचालन केले. डाळिंबाला यांनी आभार मानले.
0 Comments