"आपुलकीच्या कामाची दखल,राजेंद्र यादव यांना प्रज्ञासूर्य पुरस्कार जाहीर

सांगोला (जगन्नाथ साठे):- सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या आपुलकी प्रतिष्ठान सांगोला चे अध्यक्ष आणि पत्रकार राजेंद्र यादव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित सोलापूर जिल्हा समाज सेवा संघटना यांच्या वतीने देण्यात येणारा प्रज्ञासूर्य पुरस्कार यावर्षी जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण सोमवारी रंगभवन येथील समाज कल्याण सभागृहात होणार आहे.
पत्रकार राजेंद्र यादव हे सांगोला येथील रहिवासी असून त्यांनी पत्रकार क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे. पत्रकारितेतून सामाजिक कार्याची आवड निर्माण झाल्याने त्यांनी "आपुलकी प्रतिष्ठान"या सामजिक संस्थेची स्थापना केली. आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब, निराधार, अनाथ, अपंग लोकांना, या संघटनेच्या माध्यमातून मदत केली आणि त्यामुळेच अल्पावधीत आपुलकी प्रतिष्ठानचे नाव संपूर्ण राज्यभर चर्चेत आले आहे. राजेंद्र यादव हे रोटरी क्लबचे सदस्य असून नेहमीच सामाजिक कार्याची आवड त्यांनी जोपासली आहे.आणि त्या कार्याची पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले आहे.
सामजिक कार्य करण्याची प्रेरणा वाढविण्यासाठी मिळालेला हा पुरस्कार नक्कीच भविष्यातील प्रेरणा वाढवेल,यात शंका नाही.हा मला एकट्याला पुरस्कार मिळाला नसून आपुलकी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना मिळालेला पुरस्कार आहे - राजेंद्र यादव अध्यक्ष आपुलकी प्रतिष्ठान
0 Comments