Hot Posts

6/recent/ticker-posts

मारहाण प्रकरणी गुन्ह्यातील सहा जणांची निर्दोष मुक्तता

मारहाण प्रकरणी गुन्ह्यातील सहा जणांची निर्दोष मुक्तता

          टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील कन्हेरगाव येथील केदार वस्ती येथे शेताच्या विहिरीच्या पाण्यावरून वाद होऊन झालेल्या मारहाण प्रकरणी टेंभुर्णी ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सहा जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

          याबाबत अधिक माहिती अशी की,दि.१३ जुलै २००७ मध्ये कन्हेरगाव येथील केदार वस्ती येथे दुपारी ४.३० वा.सुमारास शेताच्या बांधाच्या व विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून एकमेकांचे नातेवाईक असलेल्या दोन गटात हाणामारी झाली होती.यामध्ये राजेंद्र संदीपान गुरगुडे,रणजित गुरगुडे,कैलास महादेव केदार,रुपाली महादेव केदार यांना मारहाण करून जखमी केले अशी फिर्याद रणजित संदीपान गुरगुडे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली होती.

          संदीपान गुरगुडे याच्या फिर्यादीवरून बाळासो निवृत्ती डोके,बाबुराव डोके,अशोक डोके,दीपक विठ्ठल डोके,राजेंद्र पांडुरंग डोके,रमेश पांडुरंग डोके यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

          या खटल्याची माढा येथील न्या.जाधवर (गीते) यांच्या कोर्टात सुनावणी होऊन न्या.जाधवर (गीते) यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.आरोपीच्या वतीने ॲड डी.के.लांडे यांनी काम पाहिले.

Reactions

Post a Comment

0 Comments