विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त योध्दा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर !

सोलापूर (कटूसत्य वृत्त): विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेखरभैय्या खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्यापैकी अकलूज शहरात महर्षी कॉलनी येथे 15 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रक्तदान शिबिर पार पडले. त्यामध्ये 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले,त्यावेळी दलित महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ खिलारे, सुबोध गायकवाड,भैय्या चंदनशिवे,शिवराम गायकवाड शेतकरी पुत्र,बाळू खिलारे,दलित महासंघ तालुका अध्यक्ष बच्चननाना साठे,सुरज गायकवाड,अक्षय माने,अभिषेक साळुंखे, व ब्लड बँकचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments