शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना शिस्तीचे धडे कोण शिकविणार ? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 19, 2022

शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना शिस्तीचे धडे कोण शिकविणार ?

शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना शिस्तीचे धडे कोण शिकविणार ? 

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्लोबल टीचर डिसले गुरुजींचा काही गोष्टींमध्ये भांडाफोड केला म्हणून अहंकार चढलेल्या किरण लोहार यांना शिस्तीचे धडे कोण शिकवणार असा प्रश्न सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात विचारला जात आहे.

          याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्राथमिक शिक्षण विभागात चाललेल्या सावळ्या गोंधळाबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागितलेली आहे. परंतु ही माहिती संबंधित अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक दिलेली नाही. माहिती दिली नाही म्हणून पुढे अपील केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हेच अपिलीय अधिकारी म्हणून आहेत. आणि त्याचाच विभागाची ही माहिती मागितलेली आहे. लोहार यांनाच ही माहिती दडवायची आहे, अशी शंका वाटत आहे. कारण यामध्ये स्वतःचाच भांडाफोड होणार असल्याची भीती किरण लोहार यांना वाटत असावी. म्हणूनच 13/4/22 रोजीच्या सुनावणीचे पत्र 11/4/22 रोजी पाठविले. बरे असो.

          सुनावणीसाठी किरण लोहार यांनी त्यांना दोन तास ताटकळत ठेवले. अहंकाराची नशा चढलेले किरण लोहार मस्तवालपणे अपीलकर्त्यास म्हणाले, तुमचे काय म्हणणे आहे सांगा. त्यावर अपीलकर्ते शांतपणे म्हणाले, मला माहिती हवी आहे. त्यावर पुन्हा लोहार म्हणाले, बर ठीक आहे मी निर्णय कळवतो, तुम्ही आता येथून जावा. त्यावेळी अपीलकर्त्याचे म्हणणे एवढेच होते की, माहिती अधिकाऱ्यास तुम्ही विचारा तुम्ही माहिती का दिले नाही. ही माहिती का दडवले आहे. कधी देणार. का आपल्या सांगण्यामुळे यांनी माहिती दिली नाही. असे साधे प्रश्न किरण लोहार यांना विचारला. परंतु अहंकार असलेले किरण लोहार म्हणाले, आम्हाला समजते तुम्ही याबाबत आम्हाला काही शिकवू नका. असे वक्तव्य करून माहिती मागणाऱ्या अपीलकर्त्यास बरोबर उद्धट वागणूक दिली. किरण लोहार या सारख्या व्यक्तीला थोडी सुद्धा जाणीव नसावी आपल्या देशात लोकशाही आहे. आणि आपण या लोकशाही देशातील एक नोकर आहोत आणि समोर बसणारे ही व्यक्ती आपल्या लोकशाही देशाची मालक आहेत. अर्थात आपलेही मालक आहेत.

          माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्या व्यक्तीस संबंधित माहिती अधिकारी किंवा अपिलीय अधिकारी यांनी संबंधित व्यक्तीला समाधान कारक असे उत्तर देणे अपेक्षित असते. याबाबतचे धडे सुद्धा शिक्षण अधिकारी म्हणून घेणाऱ्या किरण लोहार यांना आज पर्यंत कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिकविणल्याचे दिसून येत नाही.

          प्राथमिक शिक्षणाधिकरी किरण लोहार या सारख्या व्यक्तीला थोडी सुद्धा जाणीव नसावी आपल्या देशात लोकशाही आहे. आणि आपण या लोकशाही देशातील एक नोकर आहोत आणि समोर बसणारे ही व्यक्ती आपल्या लोकशाही देशाचे मालक आहेत. अर्थात आपलेही मालक आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages