प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी साखळी उपोषण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 19, 2022

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी साखळी उपोषण

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी साखळी उपोषण

प्राथमिक शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा परिषदसमोर साखळी उपोषण करत असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांनी दैनिक कटूसत्यसी बोलताना सांगितले. 

          याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सोलापूर जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रश्नांच्या बाबतीत अनेक वेळेला प्रत्येक खाते प्रमुखांशी व आपल्याशी चर्चा केलेली आहे व निवेदने दिलेली असून याबाबत ब-याचवेळा प्रश्न मुदतीत सोडविण्याचे आश्वासन देऊन सुध्दा अद्याप प्रश्न सुटलेले नाहीत. याच प्रश्नांची सोडवणूक महाराष्ट्रातील इतर जिल्हयांमध्ये एक वर्षापूर्वीच झालेली आहे. बदली पोर्टलला रिक्त जागा कळविल्यानंतर प्रश्न सोडविणे अडचणीचे होणार आहे म्हणून विस्ताराधिकारी / केंद्र प्रमुख पदोन्नती करणे., समाजशास्त्र विषयाचा नकार मंजूर करून विज्ञान विषय शिक्षकांची नेमणूक करणे., कन्नड / उर्दू माध्यमाचे मुख्याध्यापकांचे समायोजन करणे., D.C.P.S. धारकांचा कपातीचा हिशोब देणे., पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचा विनाविलंब लाभ देणे., संच मान्यतेतील त्रुटी लवकरात लवकर दूर करण्यात याव्यात. व शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय देयके त्वरीत मंजूर करून त्यांच्या रक्कमा लवकरात लवकर देणे या प्रश्नांच्या सोडवणूकी करीता शिक्षक संघाच्या वतीने दिनांक १८,१९ व २० एप्रिल २०२२ रोजी तीन दिवसाचे साखळी उपोषण करण्यत येणार असून साखळी उपोषणानंतरही प्रश्न नाही सुटल्यास त्याच ठिकाणी २१ एप्रिल २०२२ पासून शिक्षक संघाचे कार्यकर्ते आमरण उपोषणास सुरवात करतील, याची नोंद घेण्यात यावी. असा इशाराही मोरे यांनी शेवटी दिला.

          या साखळी उपोषणास सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस बब्रुवाहन काशीद, जोतिराम बोगे, कोषाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, सल्लागार समितीचे अध्यक्ष लहू कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय काशीद पाटील, एकनाथ भालेराव,  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बा.म. पाटील, प्रवक्ते संजय सावंत, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष अनिरुद्ध पवार, सांगोला तालुका अध्यक्ष सुहास कुलकर्णी, करमाळयाचे तालुका अध्यक्ष हनुमंत सरडे, बार्शीचे तालुका अध्यक्ष संजय देशमुख, वैरागचे  विभागाचे अध्यक्ष राजेंद्र आवारे, दीपक आबा साळुंखे पाटिल पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन गुलाबराव पाटील, विद्यमान चेअरमन मोहन औताडे, शिक्षक नेते विकास साळुंखे आदी पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages