ट्राय ट्रेनची सफर सोलापूरकरांच्या सेवेत..... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 11, 2022

ट्राय ट्रेनची सफर सोलापूरकरांच्या सेवेत.....

 ट्राय ट्रेनची सफर सोलापूरकरांच्या सेवेत.....


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिकेच्या वतीने आज श्री सिद्धेश्वर मंदिर येथे लहान मुलांनाच्या मनोरंजन साठी ट्राय ट्रेनची सुरवात करण्यात आले आहे. या ट्राय ट्रेनचे  उदघाटन आज कोल्हापूरचे तथकालीन आयुक्त मलिनाथ कलशेट्टी आणि प्रशासक तथा महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या शुभहस्ते तर श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज कडादी यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील,नगर अभियंता संदीप कारंजे,देवस्थानचे सदस्य राजशेखर येळेकर,उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.स्मार्ट सिटी व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एडवेंचर पार्क, स्ट्रीट बाजार, होम मैदान तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रक व बगिच्या विकसित करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने लहान मुलांना या ठिकाणी मनोरंजनासाठी ट्राय ट्रेन ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तिकिटाचे दर मोठया व्यक्तीला 20 रुपये , लहान मुलाना 10 रुपये आकारण्यात येणार आहे.या ट्राय ट्रेन ची सफर आज पासून सोलापूरतील नागरिकांना घेता येणार आहे.यावेळी आयुक्त व मान्यवर यांनी मंदिर परिसरात साकारण्यात येणाऱ्या लाईट अँड साऊंड शो या ठिकाणची पाहाणी केली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages