Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त आज पथनाट्याद्वारे सामाजिक प्रबोधन

सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त आज पथनाट्याद्वारे सामाजिक प्रबोधन

          सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत आज पार्क चौक आणि सात रस्ता येथे पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करण्यात आली.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आली. दोन्ही ठिकाणी पथनाट्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

          सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा परिषद समाज कल्याण, वालचंदचे समाजकार्य महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे समाजकार्य महाविद्यालय व दयानंद महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्य कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या विशेषाधिकारी सुलोचना सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments