Hot Posts

6/recent/ticker-posts

अरे भाइयों, राष्ट्रवादी की जड़े इतनी कमजोर नहीं है कि इन हादसों से हिल जाए - महेश तपासे

अरे भाइयों, राष्ट्रवादी की जड़े इतनी कमजोर नहीं है कि इन हादसों से हिल जाए - महेश तपासे

          मुंबई (नासिकेत पानसरे):-  "सिंगल प्वाइंट एजेंडा है कि कैसे हमारी एकता तोड़े, अरे भाइयों 'राष्ट्रवादी' की जड़े इतनी कमजोर नहीं है कि इन हादसों से हिल जाए" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मनसेला इशारा दिला आहे. 

          १२ एप्रिलला मनसेची सभा ठाण्यात होत आहे. यावेळी मनसेने 'करारा जवाब मिलेगा' असा एक व्हिडिओ टीजरच्या रुपात शेअर करताना त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार आणि अजित पवार यांच्या भाषणाचा उल्लेख केला आहे. मनसेच्या या टीजरमधील याच 'करारा जवाब' ला महेश तपासे यांनी त्याच्या पुढच्या लाईनने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 

          बेबुनियाद आरोप, मनगढ़त स्कैंडलस और खोद खोद के कीचड़ उछाल रहे हैं हमपर असेही महेश तपासे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

          संदीप देशपांडे यांनी जो टीजर पोस्ट केला त्याच्या पुढच्या लाईन महेश तपासे यांनी सांगितल्या आहेत. दरम्यान मनसेचा अजेंडा महाराष्ट्राच्या जनतेला सर्वश्रुत आहे. गुढीपाडव्यानंतर परत एकदा मनोरंजनासाठी आम्ही तयार आहोत असा टोला लगावतानाच महेश तपासे यांनी राष्ट्रवादीकडून राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments