लोणी काळभोर येथे श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा मोठया उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 20, 2022

लोणी काळभोर येथे श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा मोठया उत्साहात साजरी

लोणी काळभोर येथे श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा मोठया उत्साहात साजरी 

           लोणी काळभोर (अनिकेत मुळीक): लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. गेली दोन वर्षे करोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा साजरी करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदाची यात्रा नागरिकांनी प्रचंड उत्साहात साजरी केली. यानिमित्त गुढीपाडव्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना आयोजित करण्यात आले होते.

           श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पोर्णिमेला (हनुमान जयंती) असते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या वार्षिक यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली. श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता 'श्री' ना महामस्तकाभिषेक करण्यात आला. त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहातील कलशपूजन करण्यात आले. अंबरनाथ व जोगेश्वरीला हळद लावण्याचा कार्यक्रम तर हनुमान जयंती साजरी झाली. व अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा झाला. शनिवारी नैवेद्य दाखवून दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

           मंदिराच्या मैदानात खेळणी, दागिने बांगड्या, मिठाई आदींची दुकाणे मांडण्यात आली होती. मोठमोठाले पाळणे, रहाटगाडगे, आगगाडी, मेरी गो राऊंड, मौत का कुआ आदी मनोरंजणांच्या खेळण्यांजवळ तरुणी, विवाहित महिला व लहान मुले यांनी गर्दी केली होती. गावातील जुन्या अंबरनाथ मंदिरातून मानकऱ्यांनी अंबरनाथाचं चांगभलंच जयघोषात श्रींची पालखी उचलत ढोल ताश्याच्या गजरात मरवणूक काढण्यात आली. यंदा निकाली कुस्त्यासाठी एकूण २० लाखाच्या वरती बक्षिसे ठेवण्यात आली होती. 

           यावेळी प्रमुख  उपस्थित मध्ये अर्जुन पुरस्कार विजेते डी. वाय. एस.पी. पै. राहुल आवारे, महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यावेळी उपस्थित होते. व त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, कळंबा केसरी पै. मनोज  काळभोर, उत्सव कमिटी अध्यक्ष पै. महेश काळभोर, माजी उपसभापती पंचायत समिती सन्नी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर,माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, ग्रा.म.सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, माजी उपसरपंच योगेश काळभोर, आण्णासाहेब काळभोर, राजाभाऊ काळभोर, कमलेश काळभोर, अमित काळभोर आदी मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages