शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक पायलट प्रकल्प तयार करा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 20, 2022

शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक पायलट प्रकल्प तयार करा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

 शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक पायलट प्रकल्प तयार करा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

             सोलापूर(कटूसत्य वृत्त):- कोरोनाने निधन झाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आले आहेत. त्यांचे पुनर्वसन  व्हावेत्यांना सर्व लाभ मिळावेयासाठी सामाजिक जबाबदारीतूनन सर्व विभागानी एकत्र येऊन जिल्ह्यातील अशा कुटुंबाच्या  शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक पायलट प्रकल्प तयार करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम  गोऱ्हे यांनी केल्या.

             नियोजन  भवन  येथे जिल्हास्तरीय कोरोनाबाबत आढावा बैठकीत डॉ गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरमनपा आयुक्त पि. शिवशंकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीपोलीस अधीक्षक  तेजस्वी सातपुतेवैशपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ श्रीमती जयस्वालजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधवजिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेलेपोलीस उपायुक्त डॉ दीपाली घाटेमहिला व बालविकास अधिकारी डॉ विजय खोमणे आदी उपस्थित होते.

             श्रीमती गोऱ्हे यांनी सांगितले किकोरोनाने निधन झालेल्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे. ते कुटुंब निराधार होणार नाहीयाची दक्षता घ्यावी. टास्क फोर्सकृषीशालेय शिक्षणआरोग्यगृह या विभागांसह सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबासाठी एक सर्व समावेशक योजना आखावी. 1896 महिला विधवा झाल्या तर 41 बालकांचे दोन्ही पालक गमावले आहेत. यामुळे बालकांची सध्या नातेवाईक देखभाल व्यवस्थित करतातयाची पाहणी करावी. नातेवाईक सांभाळ करीत नसतील तर त्यांची सोय बालगृहासह सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात करावी. यासाठी प्रशिक्षीत सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. पतीचे निधन झाल्यानंतर त्याचे दुकान असेल किंवा इतर संपत्ती ही पत्नीच्या नावे होण्यासाठी यंत्रणांनी तालुकानिहाय शिबीरे घेऊन काम करावे. महिला शेतकरी असेल तर ती भूमिहीन होणार नाहीयाची दक्षताही घ्यावीअशा सूचनाही त्यांनी केल्या.

             प्रत्येक महिन्याच्या लोकशाही दिनी महिलांच्या तक्रारीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अधिकारी उपलब्ध असावेतअसे नियोजन करावे. मिशन वात्सल्यमधील सर्व माहिती विधवा महिलांपर्यंत पोहोचवा. शेतकीर महिलांना कृषीविषयक लाभ मिळवून द्यावेत. यामधील लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव येणे महत्वाचे आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी 65 वर्षे वयाची अटकमी उत्पन्नाचा दाखला त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावात्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

             कोविडमुळे निधन झालेल्या कुटुंबातील सदस्यांना ५० हजारांची मदत शासन देत आहेयाबाबत नागरिकांना माहितीसाठी हेल्पलाईन नंबर द्या. त्यांच्या त्रुटी दूर करून लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

             घनकचरा आणि जैविक कचरा यांचे व्यवस्थापन होण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या धर्तीवर नगरपालिकानगरपरिषदेने व्यवस्थापन करावे. यासाठी नगरपालिकांच्या बैठका घेऊन त्यांचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सोलापूर शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी योजना आखाव्यातवन संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण योजनेचा वापर करावास्मार्ट सिटीबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेतयाबाबत लेखी स्वरूपात अहवाल देण्याच्या सूचनाही श्रीमती गोऱ्हे यांनी केल्या.

             आरोग्यशिक्षणमहिला व बाल विकासजैव विविधता याबाबत काय बदल झाले याचेही निरीक्षण नोंदवावे. पुरातन पाण्याचे स्त्रोत शोधून त्याचे जतन करावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

             सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येक ठिकाणी सौर उर्जेचा वापर व्हावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांच्या ऑपरेशन परिवर्तन या अभियानाचेही त्यांनी कौतुक केले. संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकल्प जाण्यासाठी प्रयत्न करावा, 61 हॉटस्पॉट असलेल्या गावातील महिलांनी अभिनंदन ठराव करावेतअशा सूचनाही त्यांनी केल्या.

             यावेळी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी कोरोनालसीकरण याबाबतची माहिती दिली. श्री. स्वामी यांनी मुलींच्या सायकल बँकेची माहिती दिली.

             यावेळी श्रीमती गोऱ्हे यांनी कोरोना काळात लाभ मिळालेल्या बांधकाम कामगारघरेलू कामगारमाथाडी कामगाररिक्षाचालक यांची माहिती घेतली. लाभ न मिळालेल्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

             यावेळी कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांच्या नावे पाच लाख रूपये ठेव योजनेतील प्रातिनिधीक स्वरूपात मंजूनाथ कांबळेपूर्वा कांबळेनिखील कांबळेश्रुतिका सदलापुरेस्नेहा सदलापुरेओम कोरे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच कोविड काळात महसूल विभागात काम करीत असलेल्या पतीचे निधन झालेल्या राणी साबळे यांना ५० लाखांचा धनादेश श्रीमती गोऱ्हे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अस्मिता गायकवाड, धनंजय डिकोळे, गुरूशांत धुत्तरगावकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages