माढा तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तानाजी ढवळे यांची निवडी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 20, 2022

माढा तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तानाजी ढवळे यांची निवडी

माढा तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तानाजी ढवळे यांची निवडी

व्हाईस चेअरमनपदी अभिमन्यू काळभोर तर सचिव प्रशांत होवाळ यांची निवड

         टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुका पुरोगामी शिक्षक सहकारी पातसंस्थे ची मासिक सभा माढा येथील संस्थेच्या कार्यालयात सोमवारी चेअरमन मधुकर डोंगरे सर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत सर्वानुमते नूतन चेअरमन म्हणून तानाजी नारायण ढवळे गुरुजी आणि व्हाईस चेअरमन अभिमन्यू महादेव काळभोर सर तर सचिव म्हणून प्रशांत होवाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व सचिव यांचा सत्कार करण्यात आला.

         यावेळी शिक्षक समितीचे मार्गदर्शक श्री बापू चवरे सर, शिक्षक समिती तालुका अध्यक्ष श्री कैलास काशीद सर,कार्याध्यक्ष श्री दिनकर शिंदे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

         यावेळी मावळते चेअरमन श्री मधुकर डोंगरे सर यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले. या निवडीचे शिक्षक समितीच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष श्री. राजन सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. गोकुळ सुरवसे,श्री. रामेश्वर लोंढे, श्री. समीर काळे, श्री. रोहिदास कापसे, श्री. विजय मुकणे, श्री. अशोक पाटील, श्री. रामकृष्ण केदार, श्री. शिवाजी सावंत, श्री.हनुमंत पिसाळ,श्री. वामन गायकवाड, श्री. नंदकुमार भडकवाड, श्री. चारुदत्त अष्टेकर, श्री. विनोद परिचारक व सर्वच समितीप्रेमी शिक्षक बंधू- भगिनी यांनी स्वागत केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages