गणेश मंदिर टेकडी नागपूरला "अ" पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय लालफितीत अडकला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 20, 2022

गणेश मंदिर टेकडी नागपूरला "अ" पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय लालफितीत अडकला

गणेश मंदिर टेकडी नागपूरला "अ" पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय लालफितीत अडकला

          मुंबई (नासिकेत पानसरे):-  गणेश मंदिर टेकडी नागपुरला "अ" पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय लालफितीत अडकला असून, सुमारे साडेनऊ वर्षापूर्वी केलेली मागणी अजूनही पूर्ण होत नाही. याबाबत गणेशभक्तांमध्ये नाराजी असून, *मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार तसेच पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे* यांना लेखी पत्र पाठवले आहे. याबाबत तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव व ठराव मंजूर करून शासकीय निर्णयाची सूचना काढावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, गणेशभक्त व समाज भूषण, श्री. भूषण दडवे यांनी केली आहे.

          नागपूर शहरातील गेल्या अडीचशे वर्षे जुने भोसलेकालीन प्राचीन स्वयंभू जागृत गणेश मंदिर सीताबर्डी येथे आहे. येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. सन १९६५ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री यांनी सदर मंदिराची जागा सैन्य दलाच्या ताब्यामधून मोकळी करून मंदिराकरता उपलब्ध करून दिली आहे.

          हे देवस्थान जागृत असून, नागपूर शहराचे आराध्यदैवत म्हणून या मंदिराला मान्यता आहे. या मंदिराला "अ" वर्ग पर्यटन तीर्थक्षेत्रात समाविष्ट करण्यात येऊन या मंदिराचा विकास करण्याकरिता शासनाने आर्थिक मदत करण्यात करावी व नागपूर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिराचा विकास करावा. अशी मागणी तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सध्याचे रस्ते विकास केंद्रीय मंत्री *श्री. नितिन गडकरी* यांनी तत्कालीन मुख्यमंत्री *श्री. पृथ्वीराज चव्हाण* यांच्याकडे दिनांक ३०/०१/२०१३ रोजी केली होती. त्यानंतर १९/१२/२०१३ व ०९/०२/२०१४  रोजी स्मरणपत्रही देण्यात आले होते.

          १७/०३/२०१८ रोजी नागपूर जिल्हा नियोजन समितीने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. उपरोक्त शासन निर्णय २२/०२/२०१९ व  शुद्धिपत्र ०/८/०३/२०१६ अन्वये निश्चित करण्यात आले होते. तरीही याबाबतचा शासन निर्णय अजूनही लालफितीत अडकला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री *श्री. देवेंद्र फडणवीस* यांनी याची दखल घेतलेली नाही. तरी याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन, गणेश भक्तांना दिलासा द्यावा. अशी मागणी गणेशभक्त *श्री. भूषण दडवे* यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages