माढ्यात हिंदु मुस्लिम महिला एकवटल्या,महिलांच्या इफ्तार पार्टीला गर्दी, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातुन नगराध्यक्षा अॅड.मिनल साठेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 19, 2022

माढ्यात हिंदु मुस्लिम महिला एकवटल्या,महिलांच्या इफ्तार पार्टीला गर्दी, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातुन नगराध्यक्षा अॅड.मिनल साठेचे आयोजन

माढ्यात हिंदु मुस्लिम महिला एकवटल्या,महिलांच्या इफ्तार पार्टीला गर्दी, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातुन नगराध्यक्षा अॅड.मिनल साठेचे आयोजन 

          माढा  (कटूसत्य वृत्त):- हिंदु मुस्लिम महिला माढा शहरात मोठ्या संख्येने एकवटल्या. निमित्त होतं महिलांसाठी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे.

          प्रियदर्शनी महिला विकास मंडळाच्या माध्यमातुन नगराध्यक्षा अॅड मिनल साठे यांनी सोमवारी सायंकाळी नगरपंचायत च्या स.म.गणपतराव साठे सभागृहात महिलांची इफ्तार पार्टी पार पडली.गेल्या ५ वर्षापासुन हा उपक्रम राबविण्यात येत असून  पुरुषांच्या इफ्तार पार्ट्या सर्वत्र होताना दिसतात.मुस्लिम महिलांनी रमजान सणाच्या काळात घराच्या बाहेर येऊन त्यांना रमजान सणाचा आनंद मिळावा.तसेच हिंदु मुस्लिम ऐक्याचा संदेश या माध्यमातुन देण्याचा उद्देश असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा अॅड मिनल साठे यांनी बोलताना सांगितले.इफ्तार पार्टीस आलेल्या मुस्लिम महिलांचा सन्मान करुन त्यांना इफ्तार पार्टी देण्यात आली.महिलांची ही इफ्तार पार्टी सोलापूर जिल्ह्यातील अन्य ठिकाणी कुठे होत नसुन माढ्यात ती पार पडतीय.

          यावेळी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,नगरसेविका निर्मला थोरात,गितांजली देशमुख यांचेसह नगरपंचायत च्या नगरसेविका प्रियदर्शनी मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages