घेरा पुरंदर येथे "लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ" स्थापन करावे ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 19, 2022

घेरा पुरंदर येथे "लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ" स्थापन करावे !

घेरा पुरंदर येथे "लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ" स्थापन करावे !

घेरा पानवडी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गौतम बेंगाळे यांची माजी अर्थमंत्र्यांकडे मागणी 

          मुंबई (नासिकेत पानसरे) : जगाला अहिंसा, शांती, बंधुता,समता आणि मानवतेचा विश्वव्यापी संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या नावाने पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील घेरा पुरंदर येथे "लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ" स्थापन करावे, अशी मागणी घेरा पानवडी फाउंडेशनचे संस्थापक संचालक अध्यक्ष डॉ. गौतम बेंगाळे यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे विधानभवनात केली. याबाबत मुनगंटीवार यांनी तातडीने याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे.

          विधानभवनात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात त्यांनी हे निवेदन दिले. त्याप्रसंगी महात्मा ज्योतीराव फुले यांची वंशज नीता हुले-फुले, सामाजिक कार्यकर्ते दॊलतराव देंडे उपस्थित होते. घेरा पुरंदर येथे २०४७ एकर शासकीय वन विभागाची पडीक डोंगराळ जमीन उपलब्ध आहे.

          या जागेवर युवक, ध्यान विपश्यना, मूल्य,शिक्षण, कौशल्य विकास, पारंपरिक भाषा उदा. संस्कृत, मोडी, प्राकृत, पाली, हिंदी इत्यादीचा प्रचार-प्रसार करता येईल असेही अध्यक्ष डॉ. गौतम बेंगाळे यांनी सांगितले.या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आव्हाने स्वीकारणारे विद्यार्थी तयार करता येतील, याकडे ही डॉ. बेंगाळे यांनी लक्षवेधले. 

          या विद्यापीठामुळे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, औद्यगिक, संविधानिक, राजकीय मूल्य विकसित होतील. मागासलेल्या व अविकसित परिसराचा विकास करणे शक्य होईल. पुरंदर येथील आंतराष्ट्रीय विमानतळाचा उपयोग विद्यापीठासाठी जागतिक संशोधन विविध देशातील तज्ञ विचारवंत तंत्रज्ञान इत्यादीचा अभ्यासक करून प्रगती साधने शक्य होईल. जगात १०० अधिक देशांनी बौद्ध संस्कृती जोपसली आहे. त्यांच्या विचाराचा, तंत्रज्ञानाचा आधुनिक जीवनमूल्य इत्यादीचा उपयोग आपल्या देशातील युवक युवतींना होईल असे अध्यक्ष डॉ. गौतम बेंगाळे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages