बॅंक खात्यात पाचशे रुपये नसल्यास भरावा लागणार दंड! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 21, 2022

बॅंक खात्यात पाचशे रुपये नसल्यास भरावा लागणार दंड!

बॅंक खात्यात पाचशे रुपये नसल्यास भरावा लागणार दंड !

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जनधन व पगारीचे खाते वगळता उर्वरित बॅंक खात्यात खातेदारांना किमान पाचशे रुपयांचा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतोच. तेवढी रक्कम नसलेल्या खात्याला दर तीन महिन्याला १०० रुपयांचा दंड आणि त्या रकमेवरील १८ टक्के जीएसटी, असे एकूण जवळपास १८८ रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

            बॅंक खाते उघडले आणि त्यावरून कर्ज काढले किंवा जे काम होते ते झाले की अनेकजण त्या बॅंकेकडे ढुंकूनही पाहात नाहीत. मिनिमम बॅलन्स नसल्याने किंवा त्या बॅंक खात्यातून व्यवहार न केल्याने अनेकांची बॅंक खाती बंद पडली आहेत. बॅंक खाते व्यवस्थित राहण्यासाठी, बॅंकेकडून कोणताही दंड आकारला जाऊ नये म्हणून प्रत्येक ग्राहकाने त्याच्या खात्यात किमान पाचशे रुपयांची रक्कम ठेवणे अपेक्षित आहे. सुरवातीला अनेक बॅंकांकडून किंवा ग्राहकांच्या स्वत:च्या मागणीमुळे त्यांना चेकबुक दिले जाते. मिनिमम बॅलन्स मेन्टेन न करणाऱ्याकडेही चेकबुक आहेत. त्यामुळे त्या ग्राहकाला दर तीन महिन्यांनी ३६६ रुपयांचा दंड भरावा लागतो. आता सर्व व्यवहार ऑनलाइन झाल्याने बॅंकेतील हेलपाटे किंवा बॅंकांबाहेरील रांगा कमी झाल्या आहेत. तरीही, बॅंकेच्या निकषांप्रमाणे त्या ग्राहकाला बॅंक खात्यात पाचशे ते एक हजार रुपयांचा मिनिमम बॅलन्स ठेवावाच लागतो. दोन महिने खात्यात पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्कम होती आणि तीन महिन्यांनी दंड आकारला जाऊ नये म्हणून शेवटच्या महिन्यात काहीजण पाचशे रुपये त्या खात्यात ठेवतात. मात्र, त्यांना जेवढे दिवस खात्यात मिनिमम बॅलन्स नव्हता, तेवढ्या दिवसांचा दंड आकारला जातो. त्यामुळे बॅंक खाते सुस्थितीत ठेवून आपले क्रेडिट तथा सी-बिल चांगले राहण्यासाठी सर्वांनी खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवावा आणि त्या खात्यातून सहा महिन्यांतून किमान एकवेळा तरी व्यवहार करावेत, असे आवाहन बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

व्यवहारावेळी ‘या’ गोष्टींकडे असू द्या लक्ष...

  1. बॅंक खात्यात किमान पाचशे ते एक हजार रुपयांचा बॅलन्स ठेवाच
  2. चेकबुक (धनादेश) घेतल्यास बॅंक खात्यात मिनिमम ५०० रुपये असावेत
  3. ज्या बॅंकेचे एटीएम आहे, त्याच बॅंकेच्या एटीएममधून मोफत ट्रान्झॅक्शन पाचवेळा
  4. दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधूनही तीनवेळा मोफत पैसे काढण्याची तथा पाठवण्याची सवलत
  5. मर्यादेपेक्षा अधिकवेळा एटीएमचा वापर झाल्यास प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी २० रुपयांचे शुल्क
  6. बॅंकेच्या क्रेडिट कार्डमधून शक्यतो रोखीने पैसे काढू नका; मुदतीत पैसे न भरल्यास ३६ टक्के व्याज भरावे लागेल
दरवर्षी शेकडो कोटींचा दंड

            एकाच बॅंकेत खाते असलेल्या खातेदारांची संख्या खूपच कमी आहे. पण, अनेक बॅंकांमध्ये खाती असलेले ग्राहक सर्वाधिक आहेत. काहींना मिनिमम बॅलन्स ठेवणे शक्य होत नाही, तर काहींना कोणत्या बॅंक खात्यात किमान रक्कमदेखील नाही, याची माहितीच नसते. वेगवेगळ्या बॅंकांकडून कर्ज घेण्यासाठी भरमसाठ खाती उघडली जातात. पण, त्यावर मिनिमम रक्कम नसल्याने त्यांना दंडाच्या स्वरूपात भुर्दंड भरावा लागतो. दरवर्षी हजारो ग्राहकांना शेकडो कोटींचा दंड होतो, असेही काही बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages