सोलापूरात मद्यधुंद कार चालकाने दोन दुचाकीस्वाराना उडवले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 21, 2022

सोलापूरात मद्यधुंद कार चालकाने दोन दुचाकीस्वाराना उडवले

सोलापूरात मद्यधुंद कार चालकाने दोन दुचाकीस्वाराना उडवले

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एका मद्यधुंद चालकाने दोन मोटरसायकलला उडवले, सुदैवाने यात ते दोन्ही दुचाकीस्वार वाचले. त्या मद्यपी कार चालकाला शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास कंबर तलाव ब्रीजच्या उताराला घडली.

          दुपारी साडे तीनच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची एम एच 13 डी ई 9849 या नंबरची इर्टिगा ही कार महावीर चौका कडून पत्रकार भवन मार्गे विजापूर रोडकडे जात होती मात्र चौकात त्या कारने अचानक दोन दुचाकी चालकांना उडवले त्यामुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला, चालकाचा गाडीवरील ताबा सुटून रस्त्यामधील दुभाजकाला  जाऊन कार धडकली. कारच्या उजव्या बाजूच्या काही भागाचे नुकसान झाले.

          हे पाहताच पत्रकार भवन चौकामधील महिला ट्राफिक पोलीस धावत आल्या, त्यांनी तातडीने त्या कारच्या चालकास बाहेर काढले तेव्हा त्याने मद्यप्राशन केल्याचे निदर्शनास आले. तो भानावर नव्हता, नागरिकांनी त्याचे नाव विचारले असता बाळासाहेब सगर असे नाव सांगत हेरिटेज अपार्टेंटमध्ये राहत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. दरम्यान जखमी झालेल्या दोन तरुणांना त्यांच्या कंपनीने घेऊन खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले पोलिसांनी चार चालकाला ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages