राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केला राष्ट्रीगीताचा अवमान..! अभिभाषणात प्रचंड गदारोळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 3, 2022

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केला राष्ट्रीगीताचा अवमान..! अभिभाषणात प्रचंड गदारोळ



राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केला राष्ट्रीगीताचा अवमान..! अभिभाषणात प्रचंड गदारोळ 
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून  वादळी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जेव्हा अभिभाषणाला सुरुवात केली तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी शिवरायांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ संयुक्त सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. त्याला प्रतिउत्तर देताना विरोधी सदस्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरु होता. अभिभाषणाच्या काही ओळी वाचून पूर्ण होते नाहीत तोच राज्यपालांनी आपले अभिभाषण एकाकी थांबवले आणि काही क्षणातच त्यांनी सभागृह सोडले. 

काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद आज अधिवेशात उमटले. त्यांचे अभिभाषण सुरु होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय... या घोषणा देत सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पूर्व संध्येपासून आक्रमक असलेल्या विरोधी सदस्यांनी कृख्यात दाऊत इब्राहिम आणि गुन्हेगारी जगताशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या सरकारने राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी करीत नवाब यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे विधीमंडळाचे संयुक्त सभागृह घोषणाबाजीने दणाणून गेले होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानभवनात उपस्तित होते. सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. उपस्थित मंत्री आणि आमदारांनीही त्यांची भेट घेतली. 
मात्र अचानक आपले भाषण पूर्ण न करता. राष्ट्रगीतासाठी ही न थांबता राज्यपाल भाषण थांबवून गेल्याने विधीमंडळात विविध चर्चांना उधाण आले होते. सत्ताधारी पक्षांतील काही सदस्यांनी विधानभवनातील शिवरायांचा पुतळ्यासमोर राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलन केले. 
तर दुसरीकडे राज्यपाल कोश्यारी यांनी अशाप्रकारे भाषण पूर्ण न करता शिवरायांचा आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्याची प्रतिक्रिया सभागृहाबाहेर व्यक्त केली.

   

   

        
  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages