ठाकरे सरकारमधील काही दाऊदच्या घरची धुणीभांडी करत आहेत, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 2, 2022

ठाकरे सरकारमधील काही दाऊदच्या घरची धुणीभांडी करत आहेत, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!

 ठाकरे सरकारमधील काही दाऊदच्या घरची धुणीभांडी करत आहेत, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!

मुंबई (कटूसत्य वृत्त):- काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला तुम्ही देशातील सत्ताही घेतली, महाराष्ट्रातीलही तुम्हाला हवी, ग्रामपंचायत, सोसायट्याही तुम्हाला हव्यात, मग आम्ही धुणीभांडी करायची का? असा सवाल केला होता. बरीच चर्चा या मुद्द्यावरून झाल्यानंतर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्ष सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. नवाब मलिक प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रच नव्हे, देशाच्या इतिहासात जे घडले नाही, ते महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. बॉम्बस्फोटाचे आरोपी, दाऊद इब्राहिमचे सहकारी यांच्यासोबत थेट व्यवहार करून आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर अख्ख राज्य सरकार त्यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. ज्यांनी दाऊद इब्राहिमला सहकार्य केले, मुंबईच्या खुन्यांशी ज्यांनी व्यवहार केला, त्यांना वाचवायला अख्ख सरकार उभे राहिले आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतर देखील मंत्रीपदावर ती व्यक्ती कायम आहे. एकप्रकारे हा राज्यघटनेचा अवमान सरकार करत असल्याचे फडणवीस म्हणाले. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते, ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, ते सरकार मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणाऱ्यांच्या पाठिशी उभे आहे, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचा टोला देखील फडणवीसांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजपला टोला लगावला होता. जेव्हा युती झाली, तेव्हा बाळासाहेबांनी सांगितले होते की तुम्ही देश सांभाळा, राज्य आम्ही सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिकाही तुम्हालाच पाहिजे, ग्रामपंचायत, स्थानिक निवडणुका सगळेच तुम्हाला पाहिजे. मग आम्ही धुणीभांडी करायची का? धुणीभांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. धुणीभांडी करणाऱ्या मराठी माणसाला ताठ मानेने उभे राहाता यावे, यासाठी शिवसेनेची स्थापना झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. फडणवीसांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. "त्यांनी काय करायचे, हे त्यांनी ठरवायचे आहे. पण त्यांच्यातील काही लोक दाऊदची धुणीभांडी करत आहेत. ती आधी बंद करायला लावा. दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही, ही जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे, ती बंद झाली पाहिजे. माझे आव्हान आहे की जशी माझी पत्रकार परिषद चालते, तशी त्यांचीही घ्या. त्यांच्याकडूनही उत्तर येऊ देत, असे फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages