महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी दत्तामामा मुळे यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 30, 2022

महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी दत्तामामा मुळे यांची निवड

महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी दत्तामामा मुळे यांची निवड 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनच्या निवडणूकीत सोलापूरतील मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष व उद्योजक आणि बिल्डर दत्तामामा मुळे हे विक्रमी मतानी निवडून आल्याने दत्तामामा मुळे यांची  महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
बिल्डर्स असोसिएशन ही ब्रिटिश काळात स्थापन झालेली संघटना आहे. संघटनेचे सुमारे आठ हजार पाचशे सभासद असून २८ शाखा आहेत. या प्रत्येक शाखेला मतदानाचा अधिकार आहे. एक मार्च रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली. अध्यक्षपदासाठी दत्तामामा मुळे आणि महेश गुंडेचा उभे होते. प्रत्येक मतदाराला घरपोच बॅलेट पेपर पाठवण्यात आले. दहा ते ३० मार्च या कालावधीत मतदान घेण्यात आले. असोसिएशनच्या मुंबई येथील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दत्तामामा मुळे यांना ५८ तर गुंडेचा यांना १९ मते मिळाली. निवडीनंतर मुळे यांचा सत्कार करण्यात आला. गुरुवारी सकाळी ते अध्यक्षपदाचा पदभार देणार आहेत. 
या निवडीबाबत दत्तामामा मुळे म्हणाले, राज्यातील बिल्डर्स, रस्ते कंत्राटदार यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि विकास कामांबाबत सरकारची समन्वय ठेवण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. शासनाच्या विविध समित्यांवर बिल्डर्स असोसिएशनच्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या संघटनेचा अध्यक्ष झाल्याचा निश्चित अभिमान आहे. बिल्डर्स आणि रस्ते कंत्राटदार यांच्या हक्कांसाठी मी काम करून सोलापूरचे देशभर करणार असल्याचे शेवटी मुळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages