Hot Posts

6/recent/ticker-posts

सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये सांस्कृतिक दिन व क्रीडासप्ताह जल्लोषात संपन्न

 सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये सांस्कृतिक दिन व क्रीडासप्ताह जल्लोषात संपन्न


 सांगोला (कटूसत्य वृत्त):-सह्याद्री फार्मसी कॉलेज,मेथवडे या महाविद्यालयात फार्मसी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविद्यालयात विविध शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा,सामाजिक उपक्रम राबवले जातात.महाविद्यालयात विविध सांस्कृतिक दिन व क्रीडासप्ताहाचें आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत महाविद्यालयात सारी डे,टाय डे,ट्विन्स डे,ट्रॅडिशनल डे,फेटा डे, कलर डे, फनफेअर असे विविध सांस्कृतिक दिन साजरे करण्यात आले त्यास उपस्थितांनी व  विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.तसेच महाविद्यालयात क्रीडासप्ताह अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये क्रिकेट,हॉलीबॉल,थ्रो-बॉल स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेस विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला,या क्रीडा स्पर्धेमुळे महाविद्यालयाचे वातावरण क्रीडामय झाले होते. फनफेअर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे व विनोदी खेळांचे स्टॉल लावले होते.या फनफेअर कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले. सर्वानी विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद व खेळांचा आनंद घेतला.हा क्रीडासप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रा.ओ.बी.डोके,प्रा.आर.एम कोळी, प्रा.ए.डी.मोरे तर सांस्कृतिक दिन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.भारत गरंडे, प्रा.एन.एन.माळी, डॉ.एम.जि.शिंदे,प्रा.व्ही.पी.आनेकर, प्रा.कोळी आर.एम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांचे योगदान लाभले.



Reactions

Post a Comment

0 Comments