वादग्रस्त विधानावर पडळकरांची अखेर दिलगिरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 9, 2022

वादग्रस्त विधानावर पडळकरांची अखेर दिलगिरी

वादग्रस्त विधानावर पडळकरांची अखेर दिलगिरी

 



मुंबई - कायदा व सुव्यवस्था मुद्द्यावरुन राज्य सरकारवर विरोधकांनी घेरले असताना, गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केलेले वादग्रस्त विधान विरोधकांच्या अंगलट आहे. सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत, माफी मागावी, अशी भूमिका लावून धरली.सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकपणामुळे पडळकर यांनी अखेर अनावधानाने चुकीचे व्यक्त झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. यामुळे या वादावर पडदा पडला.कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 260 अन्वये प्रस्ताव चर्चेसाठी मांडला. भाजपचे विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. राजकीय नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कटकारस्थान सुरु आहेत. विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भांडाफोड केला आहे.शरद पवार यांच्यावर ही फडणवीस यांनी निशाणा साधला. हाच धागा पकडून पडळकर यांनी काहींची राजकीय सुरुवात पाठीत खंजीर खुपसून झाली. रक्तरंजीत अशी कारकिर्द असल्याचा आरोप शरद पवार यांचे नाव न घेतला केला.यानंतर गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधान परिषेदत गुन्ह्याचा पाढा वाचला. यावर पडळकर यांनी वादग्रस्त विधान केले. यावर शंभूराजे देसाई यांनी आक्षेप घेतला. संबंधितांवर कोणत्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे, हे मला पुन्हा सभागृहाला सांगावे लागेल, असे स्पष्ट केले. तसेच पडळकरांचे शब्द पटलावरुन काढून टाकायची मागणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages