Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड.मिनलताई साठे यांना उत्कृष्ट राष्ट्रीय महिला पुरस्कार प्रदान

 माढ्याच्या  नगराध्यक्षा अॅड.मिनलताई साठे यांना उत्कृष्ट राष्ट्रीय महिला पुरस्कार प्रदान




माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड मिनलताई दादासाहेब  साठे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्कार दिल्ली येथे  प्रदान करण्यात आला.नॅशनल युथ अॅवार्ड फेडरेशन ऑफ इंडिया,डाॅ.विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना  दरवर्षी  ८ मार्च   जागतिक महिला दिनी सन्मानित करण्यात येते.महिला सक्षमीकरण करण्यासाठी माढा शहरासह परिसरात राबवलेल्या  कार्यक्रम,उपक्रमांची दखल घेऊन  मिनल साठे यांना राष्ट्रीय महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.माढा शहराच्या नगराध्यक्षा,जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या याबरोबरच प्रियदर्शनी महिला विकास मंडळाच्या माध्यमातून  केलेल्या कामातुन  त्यांनी महिला संघटन केलंय.मिझोराम चे राज्यपाल अमोलाकर्तन कोहली,केद्रींय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले,केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी,डॉ.मनीष गवई  ह्या मान्यवर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह,सन्मान पत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.मीनल साठे यांना या अगोदर  देखील विविध संस्थाच्या वतीने  देखील विविध  पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रियदर्शनी महिला मंडळासह नगरसेवकांनी अॅड.साठे यांचा सन्मान करुन अभिनंदन केले. हा पुरस्कार मी शहरातील समस्थ महिलांना समर्पित करते.महिला सक्षमीकरण करण्याबाबत राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन मला दिलेला सन्मान शहरवासियांचा केलेला हा मी  सन्मानच समजते.-अॅड.मिनलताई दादासाहेब साठे;नगराध्यक्षा माढा नगरपंचायत

Reactions

Post a Comment

0 Comments