Hot Posts

6/recent/ticker-posts

माध्यमिक प्रशाला वडवळ येथे महिला दिन साजरा

 माध्यमिक प्रशाला वडवळ येथे महिला दिन साजरा



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- माध्यमिक प्रशाला वडवळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिला सत्कार आणि मुलींसाठी मार्गदर्शन आयोजन केले होते प्रारंभी आई जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कर्तुत्ववान महिला पुरस्कार प्राप्त संजीवनी ताई गुंड आणिअनुराधा नागापुरे मॅडम शैलजा वस्त्रे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष यशस्वी उद्योजक वैभव बापू गुंड होते. वस्त्रे मॅडम आणि नागापुरे मॅडम यांनी विद्याथ्थीना ना खूप चांगले मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थीनी नी सुद्धा भाषणे केली अध्यक्षीय भाषणामध्ये वैभव बापू यांनी मुला मुलीनी समाजा मध्ये कसे राहिले पाहिजे यश कसे प्राप्न करावे आदि विषयी खूप चांगले मार्गदर्शन केले प्रशालेतील विद्यार्थिनींनी चे खूप कौतुक केले तसेच प्रशालेमध्ये विविध उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या वतीने कौतुक केले शाबासकी दिली. कार्यक्रमाच सूत्रसंचालन आणि सगळ नियोजन ऋतुजा मोरे हिने अतिशय उत्कृष्ट केले होते याबद्दल विशेष सत्कार ऋतुजा राजकुमार मोरे हिचा करण्यात आला प्रास्ताविक ऋतुजा मोरे हिने केले तर आभार प्रदर्शन सरिता रणदिवे मॅडम यांनी केले याप्रसंगी महिला दिनानिमित्त प्रशालेचे कर्तव्यदक्ष शिक्षक अशोक कांबळे सर यांनी मुलांना खाऊ वाटप केला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड सर सुनील शहा रावसाहेबांना नागणे लक्ष्मण राऊत आप्पा घोडके मनोज मस्के बापू दळवे टोणपे सर सूर्यवंशी सर आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments