Hot Posts

6/recent/ticker-posts

मोडनिंब येथील धोकादायक उड्डाणपुलाला नुसतीच डागडुजी ची मलमपट्टी

मोडनिंब येथील धोकादायक उड्डाणपुलाला नुसतीच डागडुजी ची मलमपट्टी

          मोडनिंब, (प्रकाश सुरवसे): सोलापूर - पुणे महामार्गावरील मोडनिंब येथील धोकादायक उड्डाणपुलावरील रस्ता अगोदरच खचला आहे.  या पुलावरून प्रवास करणे अवघड झाले आहे.  प्रशासनाने  तात्पुरती मलमपट्टी न लावता  कायमचा तोडगा काढावा  अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

          उड्डाणपुलाचा रस्ता खचल्याने बाजूच्या भिंतीही फुगल्या आहेत.  या भिंती जास्त फुगू नयेत व रस्ता  खचू नये. याकरिता संबंधित प्रशासनाच्या वतीने  लोखंडी सळईने पॅचेस मारण्यात आले आहेत.  तरीदेखील  रस्ता खचत असल्याने धोका वाढला आहे.

          भरीस भर म्हणून की काय उड्डाणपुलावर आता  १५ ते १६ ठिकाणी  विविध प्रकारची झाडे झुडपे वाढली आहेत.  ही झाडेझुडपे आज वरवडे टोलनाक्याचे महामार्ग  पथकाने  जेसीबीच्या साह्याने तोडली आहेत. हि झाडे कायमची नष्ट करायची असतील तर झाडे झुडपे तोडून लगेच केमिकल टाकावयास हवे म्हणजे  या झाडांचे खोड आतून वाढणार नाहीत.

          परिणामी संरक्षक भिंतही होणार नाही.रस्ता खचल्याने, भिंत फुगल्या ने तसेच भिंतीवर ठिकाणी झाडे झुडपे वाढल्याने अजून धोका वाढला आहे. संबंधित व्यवस्थापनाने याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

          महामार्गावरील उड्डाणपुलाची आम्ही सतत देखभाल करत असतो. सहा महिन्यांपूर्वीच मोडनिंब पुलाची दोन्ही बाजूची भिंत फुगू नये म्हणून लोखंडी पॅचेस मारले आहेत, इतर डागडुजी केली आहे. सध्या या पुलावर दोन्ही बाजूला भिंतीवर झाडेझुडपे वाढली आहेत. ती आम्ही जेसीबीच्या साह्याने पथकाच्या वतीने तोडली आहेत. नागराज मार्तंड.पथक प्रमुख, महामार्ग देखभाल-दुरुस्ती वरवडे टोल नाका. 

Reactions

Post a Comment

0 Comments