ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासकीय बैठक लावण्याचे आ. यशवंत माने यांचे आश्वासन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 8, 2021

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासकीय बैठक लावण्याचे आ. यशवंत माने यांचे आश्वासन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासकीय बैठक लावण्याचे आ. यशवंत माने यांचे आश्वासन

          मोहोळ (कटुसत्य वृत्त): ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १०% नोकर भरतीवरील निर्बंध तात्काळ उठवावेत वेतनश्रेणी, पेन्शन, आकृतिबंध सुधारीत करणे, सुधारित किमान वेतनासाठी शासनाकडून १००% टक्के अनुदान मिळावे,  ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी लावण्यात आलेली वसुलीची अट रद्द करावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती कामगार निधी संगठन  (ईएसआयसी) या कार्यालयाकडे वर्ग करावीत, ग्रॅच्युईटी रक्कम ५० हजाराऐवजी १० लाख करण्यात यावी, ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर व गावातील बॉडी बदलल्यावर कर्मचाऱ्यांना विनाकारण कामावरून काढुन टाकण्याचे प्रकार थांबवावेत, इ. प्रलंबीत  विविध अडीअडचणी व प्रश्न सोडवण्यात यावेत अशी  मागणी लेखी निवेदनाव्दारे ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव कार्याध्यक्ष मोहन लामकाने यांच्या नेतृत्वात मोहोळचे आमदार यशवंत माने यांची भेट घेवुन त्यांना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याचे लेखी निवेदन दिले आहे. यावेळी आमदार यशवंत माने यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी संदर्भात निवेदने आलेली आहेत. तुमच्या प्रश्नासाठी मा.अजित दादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात प्रशासकीय बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असुन तुमचा अनेक दिवसा पासुनच्या प्रलंबीत प्रश्न मार्गी  लावण्याचे आश्वासन कर्मचारी शिष्टमंडळास दिले आहे. 

          यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नवनाथ कांबळे छाया लोंढे बंडु चंदनशिवे धोंडीबा माडकर, दिलीप क्षीरसागर भगवान कांबळे अशोक वाघमोडे पांडुरंग खरात देशमाने डोलारे  व इतर कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages