Hot Posts

6/recent/ticker-posts

नेहरू युवा मंडळाच्या वतीने कोरोना योध्दांचा यांचा सन्मान

 नेहरू युवा मंडळाच्या वतीने कोरोना योध्दांचा यांचा सन्मान



टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- वडोली तालुका माढा येथे नेहरू युवा मंडळ सोलापूर संचलित माढा तालुक्याचे अध्यक्ष तानाजी  गाडेपाटील यांच्या हस्ते कोरोना काळात सामाजिक कामात पुढे असणाऱ्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योध्दांचा सन्मान नेहरू युवा मंडळाचे माढा तालुका अध्यक्ष तानाजी गाडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व कॅप हे पुरस्काराचे स्वरूप होते गेले दीड वर्ष झाले कोरोणा काळात आरोग्य कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी,शिक्षक,पत्रकार,पोलीस पाटील यांनी जिवाची पर्वा न करता समाजामध्ये चांगली सेवा दिली त्याबद्दल त्यांचा सन्मान करून त्यांना गौरवने हे नेहरू युवा मंडळाचे कर्तव्य असल्याचे अध्यक्ष तानाजी गाडे पाटील यांनी सांगितले.यावेळी उपस्थितांमध्ये तानाजी गाडेपाटील,डॉ शिल्पा खराडे,आरोग्य सेविका अपर्णा चव्हाण,केंद्रप्रमुख समीर काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक प्रदीपराव पाटील, मुख्याध्यापक संजय कुंभार, पोलीस पाटील धनाजी काळे, ग्रामसेवक सोनवणे,सरपंच अतुल चव्हाण,शंकर सुरवसे,ग्रा.पं सदस्य गणेश खरतडे,सुभाष लोकरे,शिवाजी जाधव, बाळासाहेब बागाव, संजय कांबळे,सतीश कांबळे,पोपट थोरात,दत्तात्रय माने,अनिल भाग्यवंत, धनाजी भागावर, विक्रम मोरे,सौ पुष्पा काळे,आशा वर्कर मोरे मॅडम इत्यादी उपस्थित होते.



Reactions

Post a Comment

0 Comments