Hot Posts

6/recent/ticker-posts

आष्टीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 आष्टीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप





मोहोळ, (कटूसत्य वृत्त):-  तालुक्यातील आष्टी गावातील पूरग्रस्त नागरिकांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदतीचा हात देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात दिलासा मिळणार असून, या वाटप कार्यक्रमास स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास महेश लंकेश्वर, रजनीश कसबे, लखन घाटे, ग्रामविकास अधिकारी ढवन, पोलिस पाटील सुरेश पाटील, प्रवीण कापुरे, नानासाहेब वाघमोडे, वसंत खरात, तानाजी वाघमोडे, सचिन गावडे, विष्णू मिलगेआदी मान्यवरांची उपस्थिती होती. पूरग्रस्त भागात शैक्षणिक साहित्य वाटप हा सामाजिक बांधिलकीचा भाग असून, अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावते, असे प्रतिपादन यावेळी उपस्थितांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments