Hot Posts

6/recent/ticker-posts

माचनूर उपविभागाला मिळाले हक्काचे पाणी, मा.आ. राम सातपुते यांच्या प्रयत्नांना यश

 माचनूर उपविभागाला मिळाले हक्काचे पाणी, मा.आ. राम सातपुते यांच्या प्रयत्नांना यश




नातेपुते  (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्याच्या पूर्वेकडील माचनुर उपविभागा अंतर्गत येणाऱ्या सुमारे 20 गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न माजी आ. राम सातपुते यांनी बुधवारी मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत या भागातील लाभधारक शेतकऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत सोडविल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, माळशिरस तालुक्यामध्ये नीरा उजवा कालव्याद्वारे शेतीच्या पाण्याची व्यवस्था केली जात असताना माळशिरस तालुक्यामध्ये नातेपुते, माळशिरस ,खंडाळी महाळुंग व वेळापूर असे उपविभाग करण्यात आले होते यानुसार माळशिरस तालुक्यात नीरा उजवा कालव्याचे पाणी आल्यानंतर  टेल टू हेड या सिंचन प्रणालीनुसार माळशिरस तालुक्यात टेल म्हणजेच शेवटी वेळापूर उपविभागाला पाणी नियमानुसार जाणे गरजेचे होते परंतु सन 2016 ला तत्कालीन कालवा सल्लागार समितीने माचनूर उपविभाग हा आठमाही दाखविण्यात आला याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील माचनूर गावचे कार्यालय माळशिरस या ठिकाणी स्थलांतर करून माचनूर उपविभाग अंतर्गत वेळापूर भाळवणी क्र 1,भाळवणी क्र 2 व माळशिरस तालुक्याच्या पश्चिमेकडील कारुंडे, मांडवे व फोंडशिरस या तीन तलावाची एक शाखा करून अशा एकूण चार शाखा माचनूर उपविभागाला जोडून पंढरपूर तालुक्यात समाविष्ट करण्यात आला.उर्वरित माळशिरस तालुक्यात चार उपविभाग राहिले यामुळे माळशिरस तालुक्यात ज्यावेळी एनआरबीसी चे पाणी यायचे त्यावेळेस पहिल्यांदा टेल टू हेड नियमानुसार हे पाणी अकलूजला जायचे व यानंतर हेड म्हणजेच नातेपुते या ठिकाणी यायचे यानंतर हेच पाणी पंढरपूर तालुक्यात टेल ला जायचे व सर्वात शेवटी माचनूर उपविभागाच्या हेडला यायचे तोपर्यंत माळशिरस तालुक्याची जी 20 गावे माचनूर उपविभागाला जोडली गेली होती त्या गावातील शेतकऱ्यांची पिके जुळून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते गेल्या दहा वर्षापासून शेतकरी या बेकायदेशीर केलेल्या नियमात बदल करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु अखेर माजी आ. राम सातपुते यांच्या प्रयत्नाने त्यास यश आले असून या वीस गावातील लोकांना त्यांच्या हक्काचे पाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयामुळे मिळणार आहे .


चौकट :
राजकीय ताकद वापरून  बेकायदेशीररित्या  माळशिरस तालुक्यातील जवळपास  20 गावे माचनूर उपविभागाला जोडण्यात आली होती यावर सातत्याने या भागातील शेतकरी राजा आवाज उठवित होता अखेर राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत सदर भागातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करून या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे बारमाही पाणी मिळवून दिले येत्या हंगामात या लाभधारक शेतकऱ्यांना पाणी देण्याचे आदेश मा. जलसंपदा मंत्री महोदयांनी दिले आहेत.                              मा .आ.रामभाऊ सातपुते

Reactions

Post a Comment

0 Comments