Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात महात्मा गांधीजी यांना विविध उपक्रमाद्वारे अभिवादन

लोकमंगल कृषी महाविद्यालयात महात्मा गांधीजी यांना विविध उपक्रमाद्वारे अभिवादन



वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महात्मा गांधीजींचा जयंती उत्सव विविध उपक्रमांनी संपन्न झाला. महाविद्यालयामध्ये स्वच्छता ही सेवा, एक दिन, एक घंटा, एक साथ राष्ट्र स्वच्छता, रक्तदान शिबिर, प्रेरणादायी व्याख्याने, सामाजिक उपक्रम इत्यादीचे आयोजन सेवा पंधरवडा निमित्त करण्यात आले होते. या सेवा पंधरवडा उपक्रमाचा शेवट महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून संपन्न झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अहिंसेची लढाई लढणारे महात्मा गांधीजी यांचा विचार देशाच्या सार्वभौमत्वासाठी अत्यावश्यक आहे. गांधीजींचे विचार आणि त्यांची जीवनशैली आजही जगाला प्रेरणा देतात. गांधीजींना आपल्या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य देशाला समर्पित केले होते. उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटीश सरकरापुढे मोठे आव्हान निर्माण केले होते. त्यांच्या याच अहिंसेच्या लढाईमुळे आपणास स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदरील जयंती उत्सवाचे व विविध उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे,  कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. सुजाता चौगुले, कृषी विद्या विभाग सहाय्यक प्राध्यापिका मीनाक्षी नाईकनवरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अजित कुरे, आणि द्वितीय वर्षातील स्वयंसेवकांची उपस्थिती होती. 

Reactions

Post a Comment

0 Comments