Hot Posts

6/recent/ticker-posts

चौडेश्वरी प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनानिमित्त श्री तोगटवीर शिक्षण संस्थेकडून सत्कार

 चौडेश्वरी प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनानिमित्त श्री तोगटवीर शिक्षण संस्थेकडून सत्कार 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कै. अ .बि. उदगिरी बालक मंदिर, बालक मंदिर,कै.आ.ह आब्बा प्राथमिक विद्यालय व श्री चौडेश्वरी प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनानिमित्त श्री तोगटवीर शिक्षण संस्थेकडून सत्कार कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता करण्यात आले.
 
सदर कार्यक्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष चिलवेरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून (श्री तोगटवीर क्षत्रिय समाज अध्यक्ष नागनाथ कोंतम होते. तसेच सुप्रसिद्ध एनेस्थेसियोलॉजिस्ट सौ.डॉ.मंजुषा शहा, चेअरमन, श्री चौडेश्वरी स.पतसंस्था लक्ष्मीकांत रा.उदगिरी, निवृत्त शिक्षिका सौ कामाक्षी जयंत उदगिरी व श्रीमती कृष्णवेणी ज.उदगिरी तसेच शिक्षण संस्थेचे पदाधिकारी संतोष रामचंद्र उदगिरी ,मल्लिकार्जुन कंदी,  विनायक मादम,उमेश मायकुंटे, चंदन म्याकल ,चेतन देवरकोंडा, प्रशालेच्या मुख्या. सौ सविता यरझल, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  विद्या शिंपी, गिरीश आब्बा,राकेश उदगिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
 
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व प्रतिमापूजन व द्विप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर  संतोष उदगिरी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर  मुख्या. सविता यरझल व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्या. विद्या शिंपी यांच्या हस्ते श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उमेश मायकुंटे यांनी प्रमुख पाहुणे डॉ. मंजुषा शहा व सेवानिवृत्त शिक्षिका सत्कार मूर्ती  कामाक्षी उदगिरी मॅडम, कृष्णवेणी ज.उदगिरी मॅडम यांचा परिचय करून दिला. नागनाथ कोंतम व सुभाष चिलवेरी यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुणे सौ मंजुषा शहा व सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या  चारही शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे सौ डॉ. मंजुषा शहा, कामाक्षी उदगिरी, कृष्णवेणी उदगिरी मॅडम,  नागनाथ कोंतम सर ,प्रशालेच्या मुख्या. सौ सविता यरझल, सहशिक्षिका श्रीमती रश्मी तरोटे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले .त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शिक्षण संस्थेचे सचिव  मल्लिकार्जुन कंदी सर यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक दिलीप फडतरे सर यांनी केले .

Reactions

Post a Comment

0 Comments