जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे "दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबीर"
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर मनोज शर्मा, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, सोलापूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सोलापूर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर व महिला व बाल विकास कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कर्णिक नगर, सोलापूर येथे "दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबीर" आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव प्रशांत पेठकर यांनी दिव्यांग बालकांच्या विविध योजना तसेच त्यांचे हक्क, अधिकार व कर्तव्य सांगितले. या शिबीरामध्ये सोलापूर शहरातील विविध सात दिव्यांग शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. १७२ दिव्यांग विदयार्थी यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच UDID प्रमाणपत्रा करीता नोंदणी, दिव्यांग आयुक्त कार्यालय तसेच महिला व बालविकास कार्यालय यांच्या कडील विविध शासकीय योजनांची माहिती देऊन अर्ज भरुन घेण्यात आले.
या शिबीरात प्रशांत पेठकर, सचिव. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर. सुलोचना सोनवणे, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, समाज कल्याण, सोलापूर, बाबासाहेब जाधव, अध्यक्ष, विधीज्ञ बार असोसिएशन सोलापूर, रेश्मा गायकवाड, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, वैशाली भोसले, जिल्हा परिविक्षा अधिकारी, शशिभुषण यलगुलवार, प्रकल्प संचालक, दिव्यांग पुनर्वसन केंद्र सोलापूर, डॉ. घुले, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर. उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामचंद्र कुलकर्णी, अधिक्षक, दिव्यांग अंध कार्याशाळा यांनी केले तर आभार प्रदर्शन शिव झुरळे, उपमुख्य, लोकअधिरक्षक कार्यालय, सोलापूर यांनी केले तर सदरचे शिबीर यशस्वी होण्यासाठी शमशोदद्दीन नदाफ, अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर, विजय माळवदकर, लिपीक, रितेश हिंगमीरे, प्रसन्न गुळेद, प्रविण विभुते, राहुल बिराजदार, शिवप्रसाद सुरपुरे, शाहरुख पिंडारी, यांनी विशेष प्रयत्न केले.
6 ऑक्टोबर रोजी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- जिल्हा लोकशाही दिन सोमवारी दि. 6 ऑक्टोबर, 2025 रोजी होणार आहे. या दिवशी जनतेच्या तक्रारी गा-हाणी ऐकण्याकरीता त्या त्या विभागातील विभाग प्रमुखांनी उपस्थित राहणे बाबतचे निर्देश शासन परिपत्रकान्वये प्राप्त आहेत.
या दिवशी आपलेकडील मागील सहा महिन्यातील लोकशाही दिनाचे निवेदनावर केलेली कारवाईचा अहवालासह हजर रहावे. तसेच आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही इ. माहितीसह सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे उपस्थित रहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या दिवशी गैरहजर राहणार असल्यास त्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.
0 Comments