नातेपुते येथील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा विवध कार्यक्रमाने संपन्न झाला. यामध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रा.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषयावर प्रा.डॉ.सी.एम साळुंखे यांचे व्याख्यान झाले. (युनेस्को) च्या यादीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांची माहिती प्रा.डी.एस थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली. तसेच गड किल्ल्यांचे पोस्टर प्रेझेंटेशन महाविद्यालयात करण्यात आले. “शहीद भगतसिंग जयंती” निमित्त त्यांच्या जीवनावर प्रा.तेलसंग एच.बी यांनी आपले विचार मांडले. “स्वच्छ नारी सशक्त परिवार” कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रूग्णालय, नातेपुते यांच्या सहकार्याने मुलींची ब्लड तपासणी करण्यात आले. तसेच २ ओक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त प्रा.एम.बी सावंत यांचे व्याख्यान घेण्यात आले. अशा प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या अध्यक्षा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल च्या सदस्या पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम घेण्यात आले. सर्व कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.बाळासाहेब निकम अध्यक्षस्थानी होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदीशचंद्र मुळीक, प्रा.उत्तम सावंत, तसेच प्रा.डॉ.सुनिता सूर्यवंशी, प्रा.श्रीकांत पवार, डॉ.कमल कांबळे, मंगल पवार, कु.दिपाली मसुगडे, प्रा.रेडेकर, मुख्यलिपिक हनुमंत वाघमोडे, नागराज करपे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एन.एस.एस स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
0 Comments