Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा, समाजातील वयोवृद्धांचा सत्कार

 ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा, समाजातील वयोवृद्धांचा सत्कार




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- ज्येष्ठ नागरिक दिनाचचे औचित्य साधून माढा तालुक्यातील अंजनगाव (खे) येथे गावातील ८० वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार खेलोबा जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील होते.
यावेळी बोलताना माझी प्राचार्य नवनाथ इंगळे म्हणाले की जेष्ठ नागरिक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत. त्यांचे अनुभव आणि शहाणपण हे आपल्या भविष्याचा पाया आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वर्तमान काळात जगले पाहिजे. 
यावेळी डी एस गायकवाड,धनाजी पाटील ,सौदागर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून ज्येष्ठांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना दीर्घायुष्य चिंतले.यावेळी पांडुरंग नाईकनवरे, शुक्राचार्य इंगळे, आदिनाथ इंगळे,अंबूदेव वाघमोडे,धनाजी पाटील, सौदागर गायकवाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गावातील बहुसंख्य जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments