Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डूवाडीत डॉक्टर व पत्रकारांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान.!

 कुर्डूवाडीत डॉक्टर व पत्रकारांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान.! 




शिवजयंती व बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त शहर शिवसेने चा उपक्रम 


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- कोरोना च्या संकट काळात काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स,नर्सेस व आरोग्यसेविका यांच्या बरोबरच चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या माध्यमातील पत्रकारांचा कुर्डूवाडी शहर शिवसेनेच्या वतीने कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे,नगराध्यक्ष समीर मुलाणी,वैद्यकीय अधिक्षिका सुनंदा गायकवाड,युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन बागल नगरसेवक संभाजी सातव,हरीदास बागल,दिलीप सोणवर,विशाल गोरे यासिन बहामद,मा.शहर अध्यक्ष कुमार काका गव्हाणे,मनोज धायगुडे,किसन हानवते,हरी भराटे, बबलू कांबळे,संदीप भराठे आदी उपस्थित होते. कुर्डुवाडी शहर शिवसेने च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात घेण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार स्वागत कुमार काका गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यासाठी रणशौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शुभम गव्हाणे,शिवराज डिकोळे,सोमनाथ गवळी,बॉबीराज गवळी,स्वप्निल गवळी,बाळू कुसमुडे,गणेश कदम, प्रणेश बागल,रशीद तांबोळी,बाळाजी कोळेकर,बंटी डिकोळे,आकाश गव्हाणे बाळू डिकोळे माधव राऊत आदींनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक नागनाथ माळी सर तर आभार आकाश गव्हाणे यांनी मानले,


Reactions

Post a Comment

0 Comments