Hot Posts

6/recent/ticker-posts

संतुलन संस्थेचे कार्य गौरवास्पद.. ॲड.वसंतराव साळुंके

 संतुलन संस्थेचे कार्य गौरवास्पद.. ॲड.वसंतराव साळुंके




चंदन नगर (कटूसत्य वृत्त):- वंचिताच्या न्याय हक्कासाठी रचनात्मक संघर्ष करणाऱ्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि महिला दिनाचे औचित्य साधत भव्य संतुलन महिला परिषद व ताटली मार्च चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलन व यशस्वी महिलांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी आप आदमी पार्टी कार्याध्यक्ष व महराष्ट्र संघटक मंत्री विजय कुंभार, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल अध्यक्ष अँड.वसंतराव साळुंके,   उपाध्यक्ष अँड राजेंद्र उमाप, राष्ट्रप्रेमी युवा मंच अध्यक्ष भोला वांजळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुलकणी, सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई चव्हाण आदी उपस्थित होते,  या कार्यक्रमाचे प्रास्तविक संतुलन संस्थेच्या संचालिका अँड पल्लवी रेगे यांनी केले,  संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेचा रौप्य महोत्सव साजरा करताना पंचवीस वर्षाच्या संतुलन कार्यावर प्रकाश टाकण्याबरोबरच भविष्कालीन आव्हाने सोडविण्यासाठी संतुलन संस्थेच्या माध्यमातून कायम प्रयत्न करणार असल्याचे मत पल्लवी रेगे यांनी मांडले.यावेळी सर्व उपस्थितांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तर समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरव पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल अध्यक्ष अँड वसंतराव साळवे,  उपाध्यक्ष अँड राजेंद्र उमाप, राष्ट्रप्रेमी युवा मंच अध्यक्ष भोला वांजळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुलकणी, सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई चव्हाण, जेष्ठ समाजसेविका सरूबाई लोखंडे, राष्ट्रवादी सरचिटणीस प्रभा बागलकोट हे ठरले.याच बरोबर बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या यशस्वी महिला बचत गट प्रतिनिधी आणि प्रमुखांचा आदर्श बचत गट म्हणून सन्मान करण्यात आला. संतुलन संस्था संतुलन कौशल्य अकादमी माध्यमातून प्रशिक्षण देते त्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी महिलांचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडविण्याबाबत ठराव करण्याची घोषणा संतुलन संस्थेचे संस्थापक अँड बी.एम.रेगे यांनी केले, दिवसेंदिवस वाढत चालणारी व्यसनाधीनता व गुन्हेगारी यावर चिंता व्यक्त करतांना महिला दिनापासून सर्व दारू व जुगार अड्डे उध्वस्त करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे मत रेगे यांनी मांडले. यावेळी महिला ठराव एकमुखाने मंजूर झाला. या ठरावाचे वाचन निर्मला धुमाळ यांनी केले.यावेळी बोलताना आप आदमी पार्टी कार्याध्यक्ष व महराष्ट्र संघटक मंत्री विजय कुंभार यांनी सांगितले की महाराष्ट्रात आप आदमी पार्टीचे सरकार आल्यास निश्चितच महिलांसाठी त्यांच्या विकासासाठी वेगळी रणनीती आखली जाईल, त्यांचे जास्तीत जास्त हीत संभाळले जाईल.याप्रसंगी संतुलन पाषाण शाळा, व संतुलन निवासी पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अच्छा लगता है  फाउंडेशन, शिरूर मधील कामगार महिला यांच्या वतीने संतुलन संस्थेच्या संचालिका  अँड पल्लवी रेगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर संवाद पुनर्वसन केंद्र च्या प्रतिनिधींनी व्यसन मुक्ती अभिनय नाटिका सादर करून प्रबोधन केले. तर पोस्ट ऑफिसच्या मार्फत मुलींसाठी मोफत सुकन्या समृद्धी योजना, नवीन आधार कार्ड दुरुस्ती, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे आदी सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या. क्षेत्रिय कार्यालय येरवडा यांच्या विद्यमाने दगडखाण कामगाराचे कोविड लसीकरण करण्यात आले.या प्रसंगी वाघोली माजी सरपंच वसुंधरा उबाळे,  माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, ज्ञानेश्वर आबा कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना कटके, कविता दळवी, सुनील जाधवराव, शिवदास उबाळे, वृक्ष प्रेमी चंद्रकांत वानखेडे, जयश्री सातव, शनि शिंगारे, विजय गायकवाड, अनिल सातव, गणेश गोगावले, विक्रम वाघमारे ,अशोक शिंदे, हिरा वाघमारे, डॉ. किरण चव्हाण,डॉ.सुप्रिया चव्हाण जाहीरा शेख  रेशमा पाचरणे,योगिता अंबाडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड बी.एम.रेगे  यांनी तर आभार वंदनाताई भुजबळ यांनी मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन संतुलन संस्था, संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषद, संतुलन महिला पतसंस्था व संतुलन कार्यकर्ते यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष दगडखाण कामगार  उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments