केसनंदच्या सरपंचपदी सचिन माणिक हरगुडे बिनविरोध,सौ.अक्षदा सचिन हरगुडे उपसरपंचपदी निवड
केसनंद (कटूसत्य वृत्त):- ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन माणिक हरगुडे यांची तर उपसरपंचपदी सौ.अक्षदा सचिन हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर गुलाल भंडारा उधळून सवाद्य ग्रामदैवताचे दर्शन व सभाही घेण्यात आली.हवेली तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा केसनंद ग्रामपंचायतीत ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व आहे. नितीन गावडे यांनी ठरल्यानुसार सरपंचपदाचा तर सौ. रुपाली गणेश हरगुडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने सरपंचपदी सचिन हरगुडे यांची तर उपसरपंचपदी सौ अक्षदा सचिन हरगुडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या प्रक्रियेत मंडल अधिकारी अशोक शिंदे व ग्रामविकास अधिकारी एन. जे. ढवळे यांनी कामकाज पाहिले.या प्रसंगी पॅनेल प्रमुख, शिवसेना नेते व माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे, माजी सरपंच नितीन गावडे, एस. पी. हरगुडे, तानाजी हरगुडे, संतोष हरगुडे, प्रकाश जाधव, शंकरकाका वाबळे, रोहिणी जाधव, सुनीता झांबरे, अमित जाधव, तानाजी बांगर, शहाजी हरगुडे, श्रीहरी बांगर, राजेंद्र सावंत, रमेश बापू हरगुडे, वाल्मीक हरगुडे, संतोष हरगुडे, पंडित वाबळे, विकास गायकवाड, तुकाराम वाबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे, प्रकाश जाधव, वाल्मिक हरगुडे, राजेंद्र सावंत, तान्हाजी हरगुडे आदींसह उपस्थितांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. तर "गावच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय समोर ठेऊन गावात रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य व शिक्षण असा चौफेरविकासकामे करण्याचा मानस या वेळी नवनिर्वाचित सरपंच सचिन हरगुडे तसेच उपसरपंच सौ.अक्षदा सचिन हरगुडे यांनी व्यक्त केला. सुत्रसंचालन बाबासाहेब हरगुडे यांनी केले. तर यांनी आभार मानले. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व मान्यवरांनी गणेश मंदीर व ग्रामदैवत जोगेश्वरी मंदिरात दर्शन घेतले.
0 Comments